अर्थशास्त्र काय किंवा राज्यशास्त्र काय हे तसे क्लिष्ट विषय आहेत; पण पुण्यातील एक संस्था या विषयांसाठी जगभर ओळखली जाते. देशभरातून किंवा जगभरातून अनेक विद्यार्थी या संस्थेमध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र शिकायला येत असतात. या 'गोष्ट पुण्याची'च्या भागात अध्यापन आणि संशोधनासाठी जगभरात नावाजलेल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेला आपण भेट देणार आहोत आणि तिचा इतिहास जाणून घेणार आहोत.